पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये “ब्लू डे” आणि “रेनी डे” चे आयोजन करण्यात आले होते. निळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा संपूर्ण परिसर निळमय करून टाकला. शाळेतील वर्ग आणि परिसर निळ्या रंगाच्या सजावटीने सुशोभित करण्यात आले होते. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होते. विविध खेळ, गाणी, आणि चित्रकला स्पर्धा यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश होता. या दिवशी निळा रंग नैसर्गिक सौंदर्य, शांतता आणि आनंद यांचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात आला. ‘ब्लु डे’ सादरीकरणात विविध निळया रंगाच्या वस्तू बनवण्यात आल्या. रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच निळा रंग शांती आणि स्फुर्ती देणारा रंग म्हणुन ओळखला जातो. तसेच निळा रंगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. फुगे, मासे, छत्री, ढग, पेन्सिल, डोरीमोन बनवून विद्यार्थ्यांनी आपल्या केलेचे प्रदर्शन केले.
“ब्लु डे व रेनी डे निमीत्त प्री प्रायमरी आणि ३ री व ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यावेळी मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे संयोजन सुनिता जाधव यांनी केले. सूत्रसंचालन तृप्ती मुसळे तर सरिता अहिरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.