Chaupher News

दिल्लीत आणखी पाच वर्षांसाठी सत्ता मिळावी यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मतदारांना हमीपत्र दिले. त्यात दहा मुद्द्यांवर आश्वासन देण्यात आले असून त्याची पूर्तता केली जाईल, याची खात्रीही त्यांनी दिली. त्याशिवाय दिल्लीतील प्रदूषण तीनपटीने कमी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

केजरीवालांनी जाहीर केलेल्या गॅरंटी कार्डवर हरित दिल्ली करण्यासाठी आम्ही दाेन काेटींहून जास्त राेपटी लावणार आहाेत. या कार्डनुसार मुख्यमंत्र्यांनी चाेवीस तास अखंड वीजपुरवठा करण्याचे पहिले आश्वासन दिले आहे. शहर विजेच्या तारांच्या जाळ्यातून मुक्त हाेईल. प्रत्येक घरात भूमिगत तारांद्वारे वीज उपलब्ध करून दिली जाईल. पक्षाने आगामी पाच वर्षांत चाेवीस तास शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत पाेहाेचवण्याचीदेखील हमी दिली आहे. त्याचबराेबर २० हजार लिटरपर्यंत पाणी माेफत उपलब्ध करून देण्याची याेजनाही त्यांनी जाहीर केली. दिल्लीतील मुलांना जागतिक पातळीवरील शिक्षण देण्याची तिसरी हमी दिली आहे.

चाैथी हमी चांगल्या आराेग्य सुविधेची आहे. शहरात स्वस्त व व्यापक परिवहन सेवा देण्याचे पाचवी हमी दिली आहे. शहरात ११ हजारांहून जास्त बस व ५०० किलाेमीटरपर्यंत मेट्राे स्थानक सेवा उपलब्ध केली जाईल. साेबतच महिला, विद्यार्थ्यांसाठी बसची सेवा माेफत देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. सहावी हमी प्रदूषणमुक्तीची आहे. त्यात यमुना नदीच्या स्वच्छतेचाही विषय आहे. कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here