चौफेर न्यूज – सी बी एस ई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, साक्री तालुक्यातील सी बी एस ई ची प्रथम मान्यता प्राप्त एकमेव स्कूल अशी ख्याती असलेल्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूलने सी बी एस ई. 10 वीच्या सर्व 39 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून त्यांच्या करिअरच्या पुढील वाटचालीसाठी सज्ज झाले आहेत.त्यामध्ये प्रथम पल्लवी वाघ द्वितीय सुलिका यादव व त्रिनयन पाटील तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला सी बी.एस.ई. बोर्डाने मान्यता दिलेली आहे. शिवाय 10 वीच्या सी बी एस ई परिक्षेसाठी सेंटर आहे. त्यामुळे 10वीची परिक्षा ही प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्येच होते. उत्तम गुणवत्ताधारक शिक्षक सी बी.एस.ई. बोर्डाची स्पेशल ट्रेनिंग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळत असलेली सायन्स(विज्ञान) या विषयांची परिपूर्ण तयारी इयत्ता दहावीपर्यंत केली जाते.त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना JEE व NEET या परिक्षांची तयारी करणं खूप सोपे होते. तसेच MPSC आणि UPSC च्या अभ्यासक्रमाचा बराचसा भाग प्रचिती इंटरनॅशनल शाळेमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत पूर्ण होतो.
इंग्रजी विषयामध्ये प्रत्येक वर्षी व्याकरण आणि पाठयपुस्तक अशी दोन वेगळी पुस्तक असल्यामुळे पुढे नववी-दहावीला इंग्रजी विषय सोपा जातो. गणिताचा विषय लहान वर्गांपासूनच सखोल असल्यामुळे C.A/C.S. साठी जाणारे विद्यार्थी तयारीनेच दहावीतून बाहेर पडतात. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोलचा MPSC, UPSC परिक्षांना गरजेचा अभ्यास प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावीपासून शिकवत असल्यामुळे पुढील उच्चस्तरीय करिअर साठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो.
2010 ची स्थापना असलेली 12 वर्षे कार्यरत असलेली प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ही साक्री तालुक्यातील सी बी.एस.ई. बोर्ड प्रथम मान्यताप्राप्त शाळा आहे.