चौफेर न्यूज – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची वारंवार होणारी बदनामी थांबविण्यासाठी भाजप सोडून इतर सर्व संघटनांनी आज पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच राजकीय पक्षाच्या काही नेते मंडळीकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार आक्षेपार्य वक्तव्य करण्यात येत आहे. याचाच निषेध नोदवीण्यासाठी आज सर्व पक्ष आणि संघटनांनी पिंपरी चिंचवड शहर बंद पुकारला आहे. भाजप सोडून इतर सर्व पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या बंद मध्ये आज छत्रपती संभाजीराजे भोसले हे देखील सहभागी होणार आहेत. आजच्या पिंपरी चिंचवड शहर बंद मध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व सेवा व दुकान बंद ठेवण्याचा आव्हान सर्वपक्षीय संघटनांनी केला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठेत कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आम्ही महापुरुषांबद्दलची बदनामीकारक वक्तव्ये सहन करणार नाहीत. अवमानकरारक वक्तव्ये करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने करण्यात आले असून, या बंदमध्ये शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, कामगार, कष्टकरी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने करण्यात आले होते.