शिंदे-फडणवीस सरकार व आमदार महेश लांडगे यांचे मानले आभार
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात घेतला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात शास्तीकराचा मुद्दा मांडून तो सोडवल्याबद्दल कुदळवाडी परिसरातील नागरिक शिंदे फडणवीस सरकार व आमदार महेश लांडगे यांचे धन्यवाद करण्यासाठी दिनेश लालचंद यादव यांनी नागरिक हस्ताक्षर धन्यवाद मोहीम राबविली. सर्व शास्तीकर बाधीत नागरीकांनी एकत्र येऊन आपल्या हातानी शिंदे फडणवीस सरकार व आमदार महेश लांडगे यांचे धन्यवाद मानले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कुदळवाडी यादवनगर येथे एकत्र येत पेढे वाटून, फटाके वाजवून आंनद उत्सव साजरा केला. यावेळी कुदळवाडीतील नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.