पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात येऊ घातलेली पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा पिंपरीपर्यंत न ठेवता निगडीपर्यंत देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी (दि. 14) प्रतिकात्मक मेट्रो घेऊन पिंपरी ते निगडी असे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरप्रमुख राहूल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मेट्रो स्वारगेट ते पिंपरी ऐवजी निगडीपर्यंत यावी यासाठी शहरातील विविध संस्था राज्यकीय पक्ष नागरिकांनी सरकारकडे अनेक विनंती केल्या. परंतू मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी ते स्वारगेट असा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्व सामान्यामध्ये आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या वतीने या प्रश्नांवरती प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सल्लागार मधूकर बाबार, भगवान वाल्हेकर, सुशिला पवार, सुनिता चव्हाण, स्वरुपा खापेकर, नगरसेवक राम पात्रे, नगरसेविका विमल जगताप, शारदा बाबर, माजी नगरसेवक मारूती भापकर, दत्ता वाघेरे, विजया जाधव, प्रकाश बाबर, गीताराम मोरे, किशन तापकीर, रघुनाथ वाघ, विधानसभा प्रमुख योगेश बाबर, युवराज कोकाटे, हनुमंत लांडगे, रोमी संधू, महिला आघाडी प्रमुख वैशाली मराठे, वेधश्री काळे, मंगल घुले, शशीकला उभे, अनिता तुतारे, उषा शिंगटे, कविता जिंदाल, आशा भालेकर, श्रीदेवी लामजने, मंगल भोकरे, सारिका तामचीकर, युवा सेनेचे सचिन सानप, राकेश वाकुर्डे, उल्हास कोकणे, सुधाकर नलावडे, अमित गावडे, अमित शिंदे, संतोष सौंदकर, दिपक ढोरे, मारुती दाखले, युवराज दाखले आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमध्ये 7.15 किमी. मेट्रो सध्या येणार आहे. त्यासाठी 304 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेलेला भरावयाचे आहे. ते सर्व नागरिकांच्या मिळकत कराचे असून सर्वांना सारखी सुविधा मिळायला पाहिजे. तरच त्याचा उपयोग नागरिकांना होईल. शहरात मेट्रो करायची असेल तर निगडीपर्यंत करा अन्यथा शहराच्या हद्दीपर्यंतच करा. पुणे शहरामध्ये भूयारी मेट्रो जास्तप्रमाणात जात असल्याने मेट्रो मार्गाचा खर्च तिपटीने वाढला आहे. पिंपरी चिंचवड शहरात मात्र संपूर्ण ऐलिवेटेड मेट्रो आहे. त्याचा खर्च 7,071 कोटींच्या तुलनेत फक्त हजार कोटींचा आहे. असे सुलभा उबाळे म्हणाल्या. स्वारगेट ते पिंपरी एकूण खर्च 7,071 कोटी त्यापैकी 7.15 किमी पिंपरी चिंचवड शहर व एकूण मार्ग स्वारगेट ते पिंपरी 16.18 किमी त्यापैकी भूयारी मार्ग 5 किमी तर ऐलिवेटेड मार्ग 11.11 किमी आहे. पुणे शहरातून मेट्रो भूयारी मार्गातून जाणार आहे. परंतू त्याचा खर्च पिंपरी चिंचवडवर पडणार आहे. 1 किमी भूयारी मार्गासाठी 700 कोटी खर्च आहे. म्हणजेच 5 किमीसाठी 3500 कोटी खर्च भूयारी मार्गासाठी येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 7.15 किमी ऐलिवेटेड मार्ग असून त्यासाठी 230 कोटी प्रति किमी खर्च येणार आहे म्हणजेच 1600 कोटी खर्च त्यासाठी येईल. निगडीपर्यंत मेट्रो मार्ग केल्यास 12.15 किमी (दापोडी ते निगडी) 2800 कोटी रुपये खर्च म्हणजेच 280 कोटी रुपये स्वहिस्सा 300 कोटींचा दापोडी ते निगडी मेट्रोचा खर्च येत असताना पुणे मनपाचा खर्च पिंपरी चिंचवडकरांच्या माथी मारण्यासाठीच मेट्रो पिंपरीपर्यंत आहे. जर पिंपरीपर्यंत मेट्रो ठेवली तर 300 कोटी व 140 कोटी असा 440 कोटींचा भूर्दंड पिंपरी चिंचवड पालिकेला पडत आहे. त्यामुळे मेट्रो केली तर निगडीपर्यंत करावी नाहीतर येथील उर्वरित प्रकल्प वेगळा राबवावा. असे धोरण मनपाने घ्यावे. अशी मागणी राहुल कलाटे व सुलभा उबाळे यांनी केली. सत्तेत असलो तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर या असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळेच शिवसेनेने आजचे हे आंदोलन केले आहे. पिंपरी चिंचवड शहरावर सातत्याने अन्याय होत असून स्मार्ट सिटी, पवना नदी सुधार प्रकल्प आणि मेट्रो यामध्ये दुजाभाव होत असल्याचे शहरप्रमुख राहुल कलाटे म्हणाले. पिंपरीतून सुरु झालेल्या या आनोख्या आंदोलनाची समाप्ती निगडीतील भक्ती शक्ती चौकात झाली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.