भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास (Girish Bapat Political Journey) आहे. कसबा पोटनिवडणुकीवेळी नाकात नळी घातलेले गिरीश बापट व्हीलचेअरवरून भाजपच्या (BJP) प्रचारात उतरले होते. सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला आज आपल्यातून हरपला अशी भावना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त केली.
मी जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा नेहमीच मला मार्गदर्शन भेटले, स्वतः फोन करून बोलावून घेऊन त्यांनी काही कानमंत्र दिले होते,जेव्हा जेव्हा मी खा.गिरीश बापट साहेब यांना भेटलो तेव्हा तेव्हा मला नवी उर्जा मिळाली. आज खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला अश्या शब्दात गोरखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.