पुणे येथे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान
पिंपरी: राष्ट्रीय स्केटींग खेळाडू यश विनय चिनावले (पिंपरी चिंचवड) याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, राज्यपाल मा. श्री. रमेश बैस यांच्या शुभहस्ते २०२१-२२ चा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले. क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल दि.२८ रोजी बालेवाडी, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, क्रिडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, क्रिडा आयुक्त सुहास दिवसे यांची आदी मान्यवर उपस्थित होते.
यश चिनावले हा २००८ पासून स्केटींग खेळाचा सराव करीत असून निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेतून यशने खेळाची सुरुवात केली. त्याला वेळोवेळी शैलेंदा डुबरे, राहुल राणे आणि अशोक गुंजाळ या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र राज्यासाठी त्याने आतापर्यंत राज्यस्तरावर ११ सुवर्ण, २ कास्य आणि राष्ट्रीयस्तरावर २ रौप्य, ४ कास्य पदक पदकावली आहेत. स्केटींग खेळातील उत्कृष्ठ कामगीरीमुळे त्याला २०२१-२२ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने “सर्वोत्कृष्ट खेळाडू” म्हणून गौरविण्यात आले आहे. या यशाबददल पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी यशचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.