पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या, MSEDCLच्या मीटरिंग किऑस्कमध्ये बिघाड झाल्याने रावेत येथील संपूर्ण पंपिंग बंद पडले आहे. यामुळे, पूर्ण शहराचा (दि.२२ मंगळवार) दुपारपासूनचा तसेच सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. तसेच, उद्या (दि.२३ बुधवार) सकाळचाही पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पंपिंग स्टेशनवर महापालिकेच्यावतीने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. MSEDCL मार्फत दुरुस्ती झाल्यावर लवकरात लवकर पंपिंग चालू करून पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. दरम्यान नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन सह शहर अभियंता पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.