पिंपरी :- स्मार्टसिटी अंतर्गत पिंपळे सौदागरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
स्मार्टसिटी अंतर्गत पिंपळे सौदागरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या कामांची पाहणी आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रभागातील प्रामुख्याने पाण्याची समस्या खूपच गंभीर असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्याची व ही कामे अधिक गतीने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही नाना काटे यांनी आयुक्तांना सांगितले. यावेळी स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, स्मार्ट सिटी उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, स्थापत्य विभागाचे उप अभियंता नरेश जाधव व महापालिकेचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते.