पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत एकूण र.रू. ३९ कोटी ५७ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. प्रभाग क्र. ६ मधील चौकाचे सुशोभिकरण करणेकामी येणाऱ्या ३६ लाख ६८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील संगणकाकरिता २५० नग मायक्रोसॉफ्ट लायसन्स खरेदीकामी येणाऱ्या ५० लाख ९५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रजिमा- ३१, बिर्ला हास्पीटल रस्त्याचे आवश्यक ठिकाणी पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ९१ लाख ३० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लॉण्ड्री उपकरणाचा वापर करून मनपा दवाखाना / रुग्णालयातील लिनन (कपडे) धुलाई करणेकामी येणाऱ्या २ कोटी १० लाख ६४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१९ सुदर्शनगर परिसर व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या २७ लाख ५० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आकुर्डी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१४ मधील तुळजाईवस्ती, विवेकनगर परिसर इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ६६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१९ मधील आनंदनगर, दळवीनगर व विजयनगर परिसरात आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ९९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१४ मधील काळभोरनगर, मोहननगर परिसर, व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३२ लाख १० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१६ मध्ये किवळे व मामुर्डी येथील नाला बांधणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या ५५ लाख ७८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील पाणी नमुने त्रयस्त संस्थे मार्फत तपासणी करुन घेणेकामी येणा-या २८ लाख ३६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ६ प्रभाग क्र. २० मधील मुख्य रस्त्यांवर वरील फुटपाथची व पेव्हींग ब्लॉक विषयक कामे करणेकामी येणा-या ३९ लाख ५१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ९ मधील नाल्यांचे स्थापत्य विषयक कामे करणे व सुशोभिकरण करणेकामी येणा-या ६७ लाख २५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
रावेत येथील महामंडळाच्या हद्दीतील जागा १२.०० मी. रुंद रस्त्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात देणेबाबतची सममूल्य एकुण ७ कोटी १९ लाख midc, पुणे यांना देणेकामी खर्चास मंजूरी देणेत आली. पिंपरी चिंचवड शहरासाठी भविष्यातील लोकसंख्या अनुषंगाने/ शासन निर्णय व शुद्धीपत्रक क्र.बिसिंआ २०१८ (३९१/१८) / सिंव्य (धो) मंत्रालय, दिनांक २४/११/२०१८ अनन्वे भामा आसखेड धरणातुन ६०.७९० द.ल.घ.मी प्रतिदिन पाणी कोटा मंजूर झाला आहे. येणाऱ्या र.रु.१०.०० कोटी अदा करणेस मान्यता देण्यात आली. दिघी येथील जुनी व नवीन पाण्याची टाकीचे जागेत स्थापत्य विषयक व ईतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या २७ लाख ४२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्ते यांत्रिकी पद्धीतीने साफसफाई कामकाज ६ महिन्यांकरीता करणेकामी येणा-या १ कोटी ५ लाख ९४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.२ मोशी व उर्वरित परिसरात आवश्यकतेनुसार नविन विकसित होणाऱ्या परिसरात नविन ड्रेनेज लाईन टाकेणेकामी येणा-या ४४ लाख ७२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.२ येथे कुदळवाडी, चिखली व उर्वरित परिसरात आवश्यकतेनुसार नविन विकसित होणाऱ्या परिसरात नविन ड्रेनेज लाईन टाकेणेकामी येणा-या ५५ लाख ८२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
क क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.२ नविन विकसित होणाऱ्या डी.पी रस्त्यावर नवीन ड्रेनेज लाईन टाकणेकामी येणा-या ५५ लाख ०३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. क प्रभागांतर्गत येणाऱ्या नदी नाल्यांमधील मलनि:सारण नलिका मुख्य रस्त्यावर स्थलांतरीत करणेकामी येणा-या ५९ लाख ८७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२९ पिंपळे गुरव येथील वैदुवस्ती, सुदर्शनगर, जवळकरनगर, गुलमोहर कॉलनी इ. भागात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणेकामी येणा-या ३८ लाख ५६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.२० मधील कासारवाडी गावठाण शितळादेवी मंदिर परिसर व उर्वरित भागात मुख्य जलनि:सारण नलिका बदलणेकामी येणा-या ४५ लाख ४८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.२ येथे जाधववाडी व उर्वरित परिसरात आवश्यकतेनुसार नविन विकसित होणाऱ्या परिसरात नविन ड्रेनेज लाईन टाकेणेकामी येणा-या ४४ लाख ८४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.२० मधील महात्मा फुले नगर झोपडपट्टी व उर्वरित परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या ४४ लाख ८८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन २०१९-२० करीता प्रभाग क्र.१८ मधील परिसरात स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या २९ लाख ९६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ चिखली येथील पाटीलनगर व चिखली गावठाण परिसरात सन २०१९-२० करीता प्रभाग क्र.१८ मधील परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या ६३ लाख ४२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाल्यातील अस्तित्वात असलेल्या प्रभाग क्र.१ चिखली येथील पाटीलनगर व चिखली गावठाण परिसरात सन २०१९-२० करीता प्रभाग क्र.१८ मधील परिसरात जलनि:सारण नलिका रस्त्यावर स्थलांतरीत करणेकामी येणा-या १ कोटी १६ लाख ८१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.४ मधील मुख्य नलिकेचे मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ५७ लाख ३५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.९ मधील स्मशानभूमीचे अद्यावत पद्धतीने सुशोभिकरण करणेकामी येणा-या ७२ लाख ६७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कै. अण्णासाहेब मगर स्टेडिअम इमारत पाडणेबाबत येणा-या ८१ लाख ९२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.३० मधील दापोडी येथील क्रिडांगण विकसित करणेकामी येणा-या २५ लाख ८० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. अशुद्ध जलउपसा केंद्र, रावेत येथील टप्पा क्र.२ योजनेअंतर्गत ५० द.ल.लि क्षमतेचे पंप सेट बसविणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या ९९ लाख ५५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. अशुद्ध जलउपसा केंद्र, रावेत येथील टप्पा क्र.१ पंपाचे रेट्रोफिंटिंग करणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या १ कोटी २० लाख ३९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. आकुर्डी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१५ मधील से.क्र.२३ ते २५, निगडी प्राधिकरण परिसर व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ८५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आकुर्डी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१५ मधील से.क्र.२६ ते २८, निगडी प्राधिकरण परिसर व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ७७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.८ मधील सेक्टर नं.७ व १० व उर्वरित भागातआवश्यकतेनुसार नविन ड्रेनेज लाईन टाकणेकामी येणा-या २८ लाख ९० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.३ मधील लक्ष्मीनगर, आदर्शनगर, गंधर्वनगरी परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या २९ लाख १६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
थेरगाव परिसरातील पाणीपुरवठा विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ५१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.४ मधील दीघी मधील विजय नगर परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३० लाख ३८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.४ मधील दीघी गावठान परिसरातील मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या २९ लाख २० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.४ मधील दीघी मधील आदर्शनगर परिसरातील मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३० लाख ०१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
वायसीएमएसएच (पीजीआय) भुलशास्त्र विभागासाठी Anesthesia Worksation Machine उपकरण खरेदी करणेबाबत येणा-या २ कोटी ४९ लाख २९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. थेरगाव प्रभाग क्र.२३ मधील परिसरातील रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्थेचे नुतनीकरण करणेकामी २५ लाख ०१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.