Chaupher News

बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा चौकातील बालाजी ज्वेलर्स फोडून 10 तोळे सोने, 50 किलो चांदी आणि 66 हजार रुपयांची रोकड चोरटयांनी लंपास केली आहे. ही घटना आज (सोमवारी, दि. 20) सकाळी उघडकीस आली.
रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला व सोने, चांदी, रोकड नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिली.

सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दुकानदाराकडून नेमका आकडा न सांगितल्यामुळे चोरीला गेलेला ऐवज कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here