Chaupher News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा टोल महाग होणार आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. MSRDC अर्थात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. तसंय या टोलसाठी नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कारसाठी सध्या २३० रुपये मोजावे लागतात. १ एप्रिलपासून २७० रुपये मोजावे लागणार आहेत.
पुढील १५ वर्षांसाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचा वापर करण्यासाठी टोल आकारला जाणार आहे. एमएसआरडीसीने नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. याआधी २०१७ मध्ये मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल १८ टक्क्यांनी महागले होते. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात १८ टक्के वाढ होईल अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने २००४ मध्येच काढली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here