पिंपरी ः भारतीय जनता पार्टीमुळेच देशामधील युवकांना उज्वल भविष्य आहे. त्यातून देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळेच आपण भाजपात प्रवेश केला आहे, असे माजी नगरसेवक धनंजय विठ्ठल काळभोर यांनी सांगितले. त्यांनी बारामती, माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षामध्ये
स्वागत केले.
महिला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, खासदार संजय काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, पिंपरी-चिंचवड भाजपा शहर उपाध्यक्ष विजय शिनकर आदींसह हजारो कार्यकर्ते
या वेळी उपस्थित होते.
माजी नगरसेवक धनंजय काळभोर यांनी आकुर्डीतील दत्तवाडी, तुळजाई वस्ती प्रतिनिधीत्व केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here