पिंपरी (25 नोव्हेंबर 2016) : पिंपळेनिलख येथील स्व. सोपानराव इंगवले (पाटील) प्रतिष्ठानचे नितीन इंगवले पाटील यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित स्पर्धेत चित्रा सपकाळ यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस दुचाकी (टीव्हीएस स्कूटी), व्दितीय क्रमांक साधना कोळी एलसीडी टीव्ही, तृतीय क्रमांक रेहाना शेख रेफ्रिजरेटर यांना उद्योजक शंकर जगताप, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक विनायक गायकवाड, नितीन इंगवले पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या वेळी ‘का रे दुरावा’ मालिकेती युवा अभिनेत्री सुरूची अराडकर, युवा कार्यकर्ते हर्षल ढोरे, सुरेश चोंधे, संदीप कस्पटे, मयूर कलाटे, वसंत काटे, विजय जगताप, दीपक गोते, अभिजित शपांडे, शिवाजी दळवी, भुलेश्वर नांदगुडे, काळूराम नांदगुडे, लक्ष्मण दळवी, प्रकाश कामठे, राजेंद्र दळवी, अशोक बालवडकर, देविदास भालेकर, निवृत्तीतात्या इंगवले, मुरलीधर इंगवले, संभाजी इंगवले, नानी जगताप, कल्पना सदाकाळ, तुकाराम धरपळे, निलेश जगताप, रंजित कलाटे आदी उपस्थित होते. नितीन इंगवले यांनी स्वागत केले. श्रीकांत चौगुले यांनी सुत्रसंचालन केले. विश्वास कामठे यांनी आभार मानले.