पिंपरी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जंयतीनिमित्त त्यांना काँग्रेसतर्फे चिंचवड येथील चापेकर चौकातील पक्षकार्यालयात अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हाध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
ज्योती भारती, संग्राम तावडे, श्यामला सोनवणे, आशा शहाणे, विशाल कसबे, लक्ष्मण रुपनर, चिंतामणी सोंडकर, मयुर जयस्वाल, तानाजी निंबाळकर, सज्जी वर्की, गोरख चौधरी, अनिरुध्द कांबळे, मकरध्वज यादव, भास्कर नारखेडे, एन. ए. बारस्कर, शशीकांत काबंळे, गणेश वाल्हेकर, पांडूरंग जगताप, आदम पटेल, वैभव किरवे आदी या वेळी उपस्थित होते.