पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी तसेच चिखली पाणीपुरवठा प्रकल्प सुरु करावा, यासाठी महापालिकेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आले.
शहरात दोन वर्षांहून अधिक काळ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला, तो आजपर्यंत सुरू आहे. नियमित पाण्यासाठी सोमवारी आंदोलन केले. यावेळी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आयुक्तांसोबत चर्चा करून चिखली पाणीपुरवठा प्रकल्प सुरू करू, असे आश्वासन दिले.
महापालिका भवनासमोरील आंदोलनात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, विद्या कुलकर्णी, विशाल मानकरी, राजू सावळे, चंद्रकांत बाळा दानवले, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, मयुर चिंचवडे, सुशांत साळवी, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, तुकाराम शिंदे, अमर माळी, नितीन चव्हाण, राजू भालेराव, राजेश अवसरे, श्रद्धा देशमुख, कैलास दुर्गे, नीलेश नेटके, कृष्णा महाजन, सुरेश सकट, विशाल उकिरडे, सोनू भोसले, अॅलेक्स आप्पा मोजेस, नारायण पठारे, शिशिर महाबळेश्वरकर उपस्थित होते..