पिंपरी :- बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण तर मोबाईल कॅप्यूटर व टीव्हीच्या अतिरेकामुळे डोळ्यावर ताण येतो. परिणामी नेत्र रोगाची समस्या वाढते. यासाठीच प्रत्येकाने विशेषतः ज्येष्ठांनी डोळ्याची निगा राखणे आवश्यक आहे, असे मत माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर व इखलास सय्यद मित्र परिवार यांचे वतीने आणि नेत्र तज्ञ डॉ. नीलेश चाकणे यांच्या विशेष सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे संयोजन प्रकाश परदेशी, शाहरुख शेख, यशवंत भालेराव, दीपक सावंत यांनी नियोजन केले. यावेळी अण्णा कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर ननावारे, प्रवीण पवार, वसंत सोनार, गंगाधर चौधरी, बाळू तिरोडकर, जयसिंग पाटील, मुन्ना खिलावन, चंद्रकांत इंगळे, गिरीश जोशी, गोविंद राजेशिर्के, दीपक तापकिर, दत्ता बोर्हाडे, संगीता पारेख इत्यादी उपस्थित होते. दर सोमवारी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इखलास सय्यद यांनी केले आहे.