प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी स्कूलच्या प्राचार्य अनिता पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एल के जी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन गोल्ड मेडल, सिल्वर आणि ब्रांझ मेडल पटकावली. प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये मुलांच्या सुप्त गुणांसाठी त्यांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात. अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कौशल्य व कलागुणांना वाव मिळतो. त्यातून उद्याच्या भारताचे नेतृत्व घडत असते असे मत व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे शिक्षक वर्ग यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पगार यांनी केले.