प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे होळी व रंगपंचमी उत्साहात साजरी..

पिंपळनेर: दि. २ मार्च २०२६ रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे होळी पेटवून व रंगपंचमी खेळून होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून तसेच कलर कार्डशीटवर सुंदर चित्रे काढून सणाचा आनंद घेतला. संपूर्ण शाळेत आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाचे सर्वांगीण नियोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रभावी इनचार्ज म्हणून प्रेरणा नांद्रे मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमासाठी प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर यांनी होळी हा सण का साजरा केला जातो तसेच रंगांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांनी होळी व रंगपंचमीचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व नैसर्गिक रंग वापरण्याचा संदेश दिला.
होळी हा रंगांचा सण असून तो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. या सणातून वाईटावर चांगल्याचा विजय होतो असा संदेश दिला जातो. रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. हा सण एकता, प्रेम व बंधुता वाढवणारा आहे.
रंग हे आनंद, उत्साह, प्रेम व सकारात्मकतेचे प्रतीक आहेत. लाल रंग प्रेम व ऊर्जा दर्शवतो, पिवळा रंग आनंद व समृद्धीचे प्रतीक आहे, हिरवा रंग निसर्ग व नवचैतन्य दर्शवतो तर निळा रंग शांतता व विश्वास दर्शवतो. विविध रंगांच्या माध्यमातून जीवनात आनंद व स्नेहाचे रंग भरले जातात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योजना मॅडम यांनी केले तर माहितीपर मार्गदर्शन अश्विनी मॅडम यांनी केले. व्हिडिओ चित्रीकरणाची जबाबदारी वैशाली वाघ मॅडम यांनी पार पाडली व छायाचित्रण मयुरी मॅडम यांनी केले. या उपक्रमाची बातमी सायली मॅडम यांनी संकलित केली. कार्यक्रमासाठी बॅनर तयार करण्याचे काम निकाले मॅडम, लीना मॅडम, शीतल मॅडम, प्रतीक्षा मॅडम, पवार सर, वैशाली जगताप मॅडम, अर्चना मॅडम, किरण मॅडम, सुनिता मॅडम व अश्विनी मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी कलर कार्डशीट उपक्रमाचे नियोजन सरिता मॅडम व दिव्या मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी आपापली जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.















