पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, आपुलकीचे आणि संरक्षणाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा हा सण विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. कार्यक्रमासाठी प्रचिती पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक श्री. राहुल अहिरे सर यांचेही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन इन्चार्ज सायली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जागृती मॅडम यांचा मार्गदर्शना खाली इ,७वि च्या विद्यार्थीनी लावन्या खैरनार व परी घरटे यांनी केले. मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व आणि या सणामागील प्रेम, आपुलकी व बंधुभावाची भावना याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी रक्षाबंधनाचा उपक्रम रक्षाबंधनाचा हा उत्सव केवळ शाळेपुरता मर्यादित न ठेवता प्रचिती पब्लिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह समाजातील विविध मान्यवर व सेवाभावी व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष उपक्रम राबविला. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींच्या हस्ते राखी बांधली. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांप्रती विद्यार्थ्यांनी प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर विद्यार्थ्यांनी पिंपळनेर सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना राखी बांधली. रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती विद्यार्थ्यांनी आपुलकी आणि सन्मान व्यक्त केला. तसेच तहसील कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली. प्रशासनाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर पिंपळनेर नगरपरिषदेला भेट देऊन नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही विद्यार्थ्यांनी राखी बांधली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. दीपक पाटील सर यांनी विद्यार्थ्यांकडून राखी बांधून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची जाणीव झाली.
शाळेतील कार्यक्रम व सजावट
कार्यक्रमाच्या सजावटीमध्ये रांगोळीची जबाबदारी अश्विनी मॅडम व सुनीता मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली, तर ब्लॅकबोर्ड सजावटीची जबाबदारी किरण मॅडम यांनी सांभाळली. आकर्षक बॅनर व इतर सजावटीसाठी मोरे सर, सरिता मॅडम, मयुरी मॅडम, प्रेरणा मॅडम, सायली मॅडम, शीतल मॅडम, प्रसाद सर, निखिल सर, दिनेश सर आणि दिव्या मॅडम यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणासाठी दिव्या मॅडम व जागृती मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुंदर नृत्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणातून भाऊ-बहिणीच्या नात्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाचे फोटोग्राफीचे काम प्रसाद सर यांनी, तर व्हिडिओ चित्रीकरणाची जबाबदारी निखिल सर यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी निकाळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.



















