पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत शाळेचा परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारून गेला. या संपूर्ण उत्सवाच्या आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांत भिमराव पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गणेशमूर्तीची स्थापना शाळेचे समन्वयक श्री. राहुल आहिरे सर व त्यांच्या पत्नी सौ. भारती आहिरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन इंचार्ज सरिता मॅडम व निकाळे मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या केले.
गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षकांसह श्री गणरायाची आरती भक्तिभावाने केली. विद्यार्थ्यांनी भक्तिमय गणपतीची गीते सादर करून वातावरणात भक्तीमय रंग भरला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, रांगोळी आणि आकर्षक सजावटीमुळे गणेशोत्सवाची शोभा वाढली.
गणेशोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांसाठी “Selfie with Bappa” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वर्गांतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बाप्पासोबत छायाचित्रे काढून या आनंददायी क्षणांच्या आठवणी जपल्या.
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी शाळेत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या मा. सौ. अनिता पाटील मॅडम व श्री. श्रीकांत मनोहर पाटील सर यांनी आरती केली. या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांत भिमराव पाटील सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. पूजेच्या वेळी सर्वांनी भक्तिभावाने सहभाग घेतला व महाप्रसादाचा लाभ घेतला.
गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांनी विविध भक्तिगीते, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विशेषतः इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण उत्सवाला चैतन्य प्राप्त झाले.
आज गणपती विसर्जनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. भक्तिमय वातावरणात गणरायाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पाचा जयघोष आणि भक्तिगीतांच्या वातावरणात ही मिरवणूक लाटीपाडा धरणाच्या परिसरात पोहोचली.
लाटीपाडा धरण येथे विधिवत पूजा व आरती करून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पर्यावरणाची काळजी घेत भक्तिभावाने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्वांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏






















