प्रचिती पब्लिक स्कूल येथे 5 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री प्रशांत भीमराव पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या शिक्षिका जागृती मॅडम आणि दिव्या मॅडम यांनी केले . कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि हनुमान यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आगमनाने करण्यात आली.शाळेच्या प्राचार्या आदरणीय अनिता पाटील मॅडम आणि शाळेचे समन्वयक आदरणीय राहुल अहिरे सर यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे दिवाळीला दीपावली असेही म्हणतात दिवाळी हा प्रकाशाचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे.दिवाळी सणाच्या दिवशी घरोघरी दिवे लावले जातात,घराची स्वच्छता करून सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.घरांना आकाश कंदील आणि फुलांनी सजवले जाते.या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.
या कार्यक्रमात शाळेचे समन्वयक आदरणीय राहुल अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्त्व आणि परंपरा याविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी दिवाळी हा सण प्रकाशाचा आनंदाचा आणि उत्साहाचा असून हा सण आपल्याला अंधारातून प्रकाशा कडे जाण्याची प्रेरणा देतो असे सांगितले.तसेच दिवाळी साजरी करताना पर्यावरणाचे रक्षण करणे फटाक्यांचा अतिवापर टाळणे आणि सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच शाळेच्या प्राचार्या आदरणीय अनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी दिवाळीचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.दिवाळी हा सण केवळ दिवे लावण्याचा आणि फराळ करण्याचा नसून प्रेम आपुलकी आनंद आणि एकमेकांशी स्नेहाचे नाते जपण्याचा सण आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबा सोबत आनंदाने उत्साहाने आणि सुरक्षिततेने दिवाळी साजरी करावी असा मोलाचा संदेश दिला. दिवाळी सणातील परंपरा आणि संस्कृती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान आणि भाऊबीज या सणांचे महत्त्व सांगण्यात आले लहान मुलांना अभ्यंग स्नानाचे महत्त्व समजावून सांगत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला तसेच भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि नात्यातील जिव्हाळ्याचे दर्शन घडवण्यात आले. बहिणींनी भावांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली तसेच वसुबारसही गोमातेची पूजा करून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्त्व आणि दिवाळीच्या विविध दिवसांची माहिती देण्यात आली. वसुबारस या दिवसाची माहिती सरिता मॅडम यांनी अतिशय सुंदर अशा शब्दात सांगितली. तर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीची माहिती आरती मॅडम यांनी समजावून सांगितली. नरक चतुर्दशी या दिवसाची माहिती अश्विनी मॅडम यांनी सांगितली तर लक्ष्मीपूजन या दिवसाचे महत्त्व किरण मॅडम यांनी पटवून दिले. बलिप्रतिपदा या दिवसाची माहिती सीमा मॅडम यांनी दिली अशा पाचही दिवसांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली . या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले जसे की आकाश कंदील बनवणे पणती सजावट करणे अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा नांद्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहावीच्या विद्यार्थिनी स्वरूपा बोरसे आणि माहेश्वरी सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या फलक सजावट सुनिता मॅडम आणि सीमा मॅडम यांनी केले सुंदर अशी रांगोळी प्रेरणा मॅडम शितल मॅडम आणि सायली मॅडम यांनी काढली या कार्यक्रमाचे फोटो मयुरी मॅडम यांनी काढले तर व्हिडिओ चित्रफीत सायली मॅडम यांनी बनवली या कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य आकाश कंदील निखिल सर आणि मोरे सर यांनी बनवला तसेच बॅनर सजावटीमध्ये निखिल सर, दिनेश सर,सुनिता मॅडम,प्रसाद सर,अर्चना मॅडम यांनी केली तसेच पूजेसाठी लागणारे सुंदर अशी फुलांची रांगोळी शितल मॅडम आणि अर्चना मॅडम यांनी काढली.पूजा रांगोळी किरण मॅडम व पायरी समोरील रांगोळी आरती मॅडम यांनी काढली संपूर्ण कार्यक्रमाची बातमी लेखन शीतल मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून गरजू व्यक्तींना जुन्या कपड्यांचे व मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी इदगाव पाड्याच्या नगरसेविका सौ.लीलाबाई सोमनाथ राऊत या उपस्थित होत्या यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचा आनंद अजून द्विगुणीत झाला. आदरणीय प्रशांत भीमराव पाटील साहेब यांनी गरजू व्यक्तींना कपडे व फराळ मिळावा व त्यांनाही दिवाळी साजरी करण्यात यावी हा या मागचा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. यातून विद्यार्थ्यांना दानशूरता सहकार्य आणि गरजूंच्या मदतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.सहावीची विद्यार्थिनी लावण्याने आभार प्रदर्शन केले अशाप्रकारे आनंद,उत्साह आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दिवाळी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.














