तिन्ही शाखांत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना भावपूर्ण अभिवादन
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या साक्री, कावठे आणि कासारे या तिन्ही शाखांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांना गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता व साधेपणाचे विचार तसेच शास्त्रीजींचा प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, साधेपणा आणि ‘जय जवान, जय किसान’ हा प्रेरणादायी संदेश यांची माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर भाषणे, विचारमंथन, देशभक्तिपर गीत तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना शाळेचा परिसर व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा देण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील, मुख्याध्यापिका सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तिन्ही शाखांचे मुख्याध्यापक, शाखाप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या तिन्ही शाखांमध्ये आयोजित या संयुक्त जयंती सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.
























