१७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाची तालुकास्तरावर शानदार विजयी कामगिरी
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. चपळाई, आक्रमकता, उत्तम संघभावना आणि नियोजनबद्ध खेळाच्या जोरावर प्रचितीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केले.
या विजयी संघात आर्या सोनवणे, नक्षत्रा भामरे, समीक्षा चव्हाण, भूमिका देवरे, युगंधरा ठाकरे, आराध्या शिरसाठ, कोमल भामरे, पलक पानपाटील, तनिष्का जैन, एकता देसले, कनिष्का देवरे आणि अनुष्का नेरकर या खेळाडूंचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे आदरणीय चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील, मुख्याध्यापिका सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे, तसेच क्रीडाशिक्षक श्री कुणाल देवरे यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना या यशामुळे आणखी बळ मिळाले आहे.






















