फुलांसारखं तुझं आयुष्य नेहमी सुंदर राहो,
यशाच्या प्रत्येक वाटेवर तुझं पाऊल पडो.
स्वप्नांना तुझ्या नवी भरारी मिळो,
आनंदाने तुझे प्रत्येक क्षण फुलून जावो.
प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सहभागाने वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जागृती मॅडम यांनी कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली. शाळेच्या प्रांगणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील मॅडम ,शाळेचे समन्वयक श्री राहुल अहिरे सर सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून लाडक्या प्रचितीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील मॅडम व समन्वयक श्री .राहुल अहिरे सर यांनी प्रचितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिच्या उज्वल भविष्याची कामना आपल्या शब्दातून केली. अर्चना मॅडम व अश्विनी मॅडम यांनी आपल्या शब्दातून प्रचितीला शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच शाळेच्या चिमुकले विद्यार्थी यांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आली. विद्यार्थ्यांना कप केक वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह व आनंद होता. प्रचितीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व्यक्तींना व विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आली. आजच्या कार्यक्रमासाठी सरिता मॅडम यांनी सूत्रसंचालन केले .दिव्या मॅडम यांनी बोर्ड सजावट, किरण मॅडम यांनी बातमी लेखनाची जबाबदारी पार पाडली. तर निखिल सर यांनी व्हिडिओची जबाबदारी सांभाळली. व मयुरी मॅडम यांनी फोटोग्राफीची जबाबदारी सांभाळली. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आणि आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

















