प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे
छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्साहात साजरी


आले किती? गेले किती?
उडून गेले भरारा
संपला नाही आणि संपणार नाही
माझ्या शिवरायांचा दरारा
पिंपळनेर : दिनांक 19 फेब्रुवारी रोजी प्रचिती पब्लिक स्कूल येथे 396 शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरी करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट भगवा ध्वज आणि घोषणांमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली तसेच काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील मॅडम समन्वयक राहुल अहिरे सर यांनीही शिवाजी महाराजांचे शौर्य संघटन कौशल्य आणि स्वराज्य स्थापनेतील कार्य याबद्दल माहिती दिली इयत्ता युकेजी मधील ईश्वरी नंदन या विद्यार्थिनीने सुंदर गाणे सादर केले लावण्या लावण्या खैरनार, तेजस्वी भदाणे, दुर्वा खैरनार, सिंह माहेश्वरी सोनवणे, लावण्या ठाकरे सिया खैरनार, सिया हसानी या विद्यार्थिनींचे लेझीम नृत्य झाले लेझीम नृत्या नंतर चौथीच्या विद्यार्थ्यांनी यज्ञेश नेरकर, दक्ष सूर्यवंशी, आशिष प्रजापती, आरोही सूर्यवंशी, ज्ञानेश्वरी देसाई, वैभवी पाटील, प्रियंल नायक, श्रेया गायकवाड, स्वरा खैरनार, स्वरा घरटे, यांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्य सादर केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाला वैशाली जगताप मॅडम व शाळेच्या प्राचार्य सौ. अनिता पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेतील आवार शिवाजी महाराजांची प्रतिमा सजावट रांगोळी बॅनर या सगळ्यांनी नटले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल मॅडम, रांगोळी लीना अहिरे मॅडम प्रतीक्षा मॅडम योजना मॅडम बोर्ड डेकोरेशन
पवार सर यांनी केले लेझीम नृत्य प्रेरणा मॅडम व गाण्यावरील नृत्य मयुरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले पालखी सजावट सरिता मॅडम मॅडम सुनीता मॅडम अश्विनी मॅडम अर्चना मॅडम प्रेरणा मॅडम सायली मॅडम यांनीही आपली कार्य पार पाडली शिवजयंती निमित्त शाळेत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला पालखीचे पूजन राहुल अहिरे सर अनिता पाटील मॅडम कार्यक्रमाचे नियोजन वैशाली जगताप मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी ह्या विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे लावून सायकल रॅली काढून वातावरण प्रफुल्लित केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त नृत्य करत आनंद सोहळा साजरा केला. कार्यक्रमाची शोभा वाढविली ती राकेश जैन सर यांनी शाळेतील कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शाळेत भेट स्वरुपात दिली अशा पद्धतीने शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग कर्मचारी यांच्या उपस्थितीने नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडला व जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमला.















