प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात व दिमाखात साजरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जागृती






साक्री (जि. धुळे) : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, दिमाखात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संयोजन श्री. प्रफुल्ल साळुंके व श्रीमती जागृती जाधव यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “शिवरायांचे विचार आणि आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात रुजले पाहिजेत. स्वराज्याची प्रेरणा, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या गुणांचा अवलंब करूनच आपण खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करू शकतो. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनावे, हीच अपेक्षा आहे.”
प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाची प्रभावी मांडणी करण्यात आली. समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे, देशभक्तीपर गीते, पोवाडे आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सौ. रोहिणी सोनवणे, श्रीमती हेमांगी गवांदे व श्री. पियुष बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी शैलीत केले.
शाळेची इमारत आकर्षक सजावटीने नटली होती. श्रीमती प्रियंका पवार व श्रीमती सविता लाडे यांनी विद्यार्थिनींच्या सहकार्याने शिवरायांची सुबक व देखणी रांगोळी साकारली. सौ. वैशाली खैरनार व सौ. तेजस्विनी घरटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन यशस्वीपणे पार पाडले.
संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्धता, उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रकर्षाने जाणवत होती. शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता केली.















