प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथे
विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी रंगला ‘प्रचिरंग’
वार्षिक स्नेहसंमेलनातून संस्कार, कला व आनंदाचा भव्य उत्सव




साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथे इयत्ता नर्सरी ते पहिली तसेच आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य, गीत व विविध कलाविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, हा या स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश होता.
‘प्रचिरंग’ या नावाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्धरीत्या करण्यात आली.
कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळी, सुबक सजावट व रंगीबेरंगी मंचरचनेमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. वैभव सोनवणे, श्री. कुणाल देवरे, सौ. स्मिता नेरकर, सौ. कांचन अहिरराव, श्रीमती नम्रता गोसावी, सौ. हिरल सोनवणे, सौ. रोहिणी सोनवणे व श्री. राहुल पाटील यांनी कार्यक्रम संयोजक म्हणून विशेष परिश्रम घेतले.
या स्नेहसंमेलनात “स्त्रीशक्तीचा जागर” या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या माता-भगिनींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सचिव सौ. कविता प्रशांत पाटील यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कुणाल देवरे, सौ. वैष्णवी देवरे, श्री. श्रावण अहिरे व सौ. हेमांगी बोरसे यांनी केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहनचालक, मावशी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेला पालकवर्ग या आनंदसोहळ्याचा साक्षीदार ठरला.















