प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथील प्राचार्या यांना
‘आदर्श प्राचार्या’ व शिक्षिकेला ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान

पिंपळनेर : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय आणि समर्पित कार्याबद्दल पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ.अनिता पाटील मॅडम यांना ‘आदर्श प्राचार्या’आणि शिक्षिका सरिता आहिरे मॅडम यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनतर्फे (MESTA) २०२६ आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील मॅडम आणि शिक्षिका सरिता अहिरे मॅडम यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी घेतलेले परिश्रम, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांमधील सहभाग या कार्याची दखल घेण्यात आली.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील आणि शाळा समन्वयक राहुल अहिरे सर यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कौतुक केले आणि संपूर्ण शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.















