महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनतर्फे
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला
सलग सातव्यांदा सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार

साक्री : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनतर्फे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री या शाळेला सलग सातव्या वर्षी सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून गौरविण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती, शिस्तबद्ध व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे तसेच शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते. याच कार्यक्रमात शाळेतील सौ. तेजस्विनी घरटे, सौ. हिरल सोनवणे, सौ. रोहिणी सोनवणे व श्री. गणेश नांद्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील, प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे तसेच श्री. वैभव सोनवणे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे व शाळेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलची ही उज्ज्वल कामगिरी परिसरातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत असून भविष्यातही शाळा नवनवीन शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.















