प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री संघाचा
तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजय

साक्री : तालुका क्रीडा संकुल, साक्री येथे आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल (१७ वर्षांखालील) स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथील विद्यार्थ्यांच्या संघाने अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात प्रचितीच्या खेळाडूंनी संघभावना, शिस्तबद्ध खेळ, वेगवान चाली व अचूक डावपेच यांचा सुरेख संगम सादर करून प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यातील प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण कामगिरीमुळे संघाने प्रेक्षकांसह पंचांचीही विशेष प्रशंसा मिळवली.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करून क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करण्याचा सल्ला दिला.
या स्पर्धेचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संघाच्या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. कुणाल देवरे व श्री. वैभव सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विजयामुळे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्रीने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून शाळेच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.















