प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे
७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भारतीय सेनेतील जवान सेवानिवृत्त श्री. सूर्यकांत अहिरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
श्री. सूर्यकांत अहिरे हे गव्हाणे पाडा येथील रहिवासी असून त्यांनी देशसेवेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी २० जुलै २००० रोजी भारतीय सैन्यात ‘सोल्जर नायक’ या पदावर नियुक्ती घेतली. कर्तव्यनिष्ठा, शिस्त व देशप्रेम यांच्या जोरावर त्यांनी १६ वर्षांहून अधिक काळ सैन्यात यशस्वी सेवा बजावली. या काळात त्यांनी गुवाहाटी, चंदीगड, राजस्थान, पंजाब, जम्मू–कश्मीर, आसाम तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे विविध ठिकाणी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. अनेक आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जात त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान दिले. अखेर ३० नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांनी सन्मानपूर्वक निवृत्ती स्वीकारली.
कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संपूर्ण नियोजनासाठी शितल शिंपी मॅडम यांना शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या जाधव यांनी आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले. यावेळी समन्वयक राहुल अहिरे सर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, देशप्रेम, शिस्त व जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनीही प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सादर केली. यामध्ये
यूकेजी – रुद्राक्ष नंदन,
इयत्ता पहिली – चिराग घरटे,
इयत्ता दुसरी – तनिष्क गायकवाड,
इयत्ता तिसरी – रुद्र मोरे,
इयत्ता चौथी – अंश सूर्यवंशी,
इयत्ता पाचवी – जयेश शिंदे,
इयत्ता सहावी – परी घरटे,
इयत्ता सातवी – पुष्कर पाटील,
इयत्ता आठवी – आयुष देसले
यांनी सहभाग घेतला. इयत्ता पहिलीची विद्यार्थी विधी कुवर या विद्यार्थिनीने भारत मातेची वेशभूषा परिधान केली होती. नर्सरी क्लास चा विद्यार्थी सर्वेश बोरडे व इयत्ता तिसरीचा विद्यार्थी अंश सूर्यवंशी यांनी भारतीय सैनिकाची वेशभूषा परिधान केलेली होती.
शाळेचे संपूर्ण आवार फुले, फुगे, रंगीबेरंगी बॅनर व विद्यार्थ्यांनी केलेल्या आकर्षक सजावटीने नटले होते. सुंदर रांगोळी सायली पवार, दिव्या जाधव व सरिता मॅडम यांनी साकारली. ब्लॅकबोर्ड लेखन व माहिती देण्याची जबाबदारी पवार सर यांनी यशस्वीपणे पार पाडली. सजावटीसाठी लीना अहिरे, वैशाली जगताप, सुनिता जाधव, प्रेरणा मॅडम, प्रतीक्षा मॅडम, स्मिता मॅडम, अर्चना मॅडम, योजना मॅडम, अश्विनी मॅडम, वैशाली मॅडम, किरण मॅडम व पल्लवी मॅडम यांनी विशेष योगदान दिले.
संविधानाची प्रतिज्ञा प्रेरणा मॅडम यांनी प्रभावीपणे सादर केली. कार्यक्रमाचे छायाचित्रण मयुरी मॅडम, तर व्हिडिओ चित्रीकरण जागृती मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य वैशाली वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. देशभक्तीपर गीत व घोषवाक्य सादरीकरण किरण देवरे यांनी केले. शिस्तबद्ध मार्चपास्ट अश्विनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बातमी वाचन प्रतीक्षा, तर आभार प्रदर्शन योजना मॅडम यांनी केले.
ध्वजारोहण, संविधान उद्देशिकेचे वाचन व देशभक्तीपर गीतांमुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली. प्रमुख पाहुणे श्री. सूर्यकांत अहिरे यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त व परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी व ड्रायव्हर बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.















