प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक २६ जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे संस्थापक आदरणीय श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. आपल्या प्रेरणादायी संबोधनातून त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, देशप्रेम व नागरिकांची कर्तव्ये याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे विचार सांगितले.
यानंतर ध्वजारोहण व झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे निवृत्त सैन्य अधिकारी श्री मोतीलाल जगन्नाथ अहिरराव, शाळेचे माजी विद्यार्थी व मागील वर्षी इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी चि.पूर्व विशाल देसले व त्यांचे पालक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
सदर कार्यक्रम शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम संयोजक म्हणून श्री प्रफुल्ल साळुंके व श्रीमती जागृती जाधव यांनी जबाबदारी कुशलतेने पार पाडली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. श्रावण अहिरे व सौ. ज्योती नांद्रे यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी भाषणांमध्ये कु. अशमिरा पिंजारी, कु. हार्दिक पाटील व कु. ध्रुविका पाटील यांनी देशभक्ती, संविधानाचे महत्त्व व नागरिकांच्या कर्तव्यांविषयी आपले विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या भाषणाची तयारी सौ. पूजा जोहरी यांनी करून घेतली. आदरणीय नेत्यांच्या भूमिका साकारण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सौ. सुनिता सूर्यवंशी व सौ. मनीषा माळीव हेमांगी बोरसे यांनी करून घेतली. नेत्यांच्या भूमिका साकारणारे छोटे विद्यार्थी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व व त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोग समजावून सांगण्यासाठी कवायत संचालन घेण्यात आले. या कवायत संचालनाचे मार्गदर्शन श्रीमती सपना ठाकरे यांनी केले. तसेच इयत्ता नववीचे विद्यार्थी व शाळेचे हाऊस लीडर्स यांनी सादर केलेलापरेड संचलन (मार्चपास्ट) उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. परेड संचलनाचे मार्गदर्शन श्री कुणाल देवरे, श्री श्रावण अहिरे व श्री राहुल पाटील यांनी केले.
देशभक्तीपर नृत्यप्रस्तुतीचे मार्गदर्शन सौ. प्रभावती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात सौ. वैशाली खैरनार व सौ. तेजस्विनी घरटे यांनी मोलाचे सहकार्य केले. ध्वजगीत व राष्ट्रगीताची तयारी श्रीमती हेमांगी गवांदे व सौ. रोहिणी सोनवणे यांनी विद्यार्थिनींकडून करून घेतली. कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी सौ. सविता लाडे व श्रीमती प्रियंका पवार यांनी विद्यार्थिनींच्या मदतीने काढली. फळ्यावर सजावट सौ. पूजा जोहरी यांनी केली. विद्यार्थ्यांना मिठाई वाटपाची जबाबदारी सौ. हिरल सोनवणे यांनी पार पाडली. मैदानाची आखणी क्रीडाशिक्षक श्री. कुणाल देवरे यांनी केली. शाळेची सजावट श्रीमती दीपमाला अहिरराव व श्री पियुष बागुल यांनी केली.
कार्यक्रमाचे छायाचित्रण व चित्रफितीकरण श्रीमती नम्रता गोसावी, श्रीमती सपना ठाकरे व श्रीमती अश्विनी ठाकरे यांनी केले. हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, कर्तव्यभावना व राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.















