प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस
यांची जयंती उत्साहात साजरी

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व आजाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे यांच्या देखरेखीखाली पार पडले. प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत देशप्रेम, शिस्त, त्याग व राष्ट्रसेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी नेताजींच्या विचारांवर आधारित भाषणे सादर केली. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” या प्रेरणादायी घोषणेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींचे योगदान, आजाद हिंद सेनेची स्थापना व त्यांचे अद्वितीय नेतृत्व याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व देशभक्तीमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.















