प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे
गणेश जयंतीनिमित्त पूजा, होम-हवन व महाप्रसादाचे आयोजन

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे आज दिनांक २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त विधीवत पूजा, होम-हवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळेतील मंदिराची आकर्षक व देखणी सजावट करण्यात आली होती. हा धार्मिक कार्यक्रम सर्व ड्रायव्हर बंधूंच्या सहकार्याने शांत, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. सदर उपक्रम प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी इन्चार्ज व समन्वयक श्री. तुषार देवरे तसेच श्री. वैभव सोनवणे यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केली.
पूजेनंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षकवर्ग व कर्मचारी यांनी मोठ्या भक्तिभावाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे शाळेत धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला.















