प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे
इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व अॅनिमिया तपासणी मोहीम

साक्री : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच त्यांच्यातील अॅनिमियासारख्या आजारांचे वेळेवर निदान व्हावे, या उद्देशाने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी व अॅनिमिया (रक्तक्षय) तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमाअंतर्गत सरकारी दवाखान्याच्या वैद्यकीय पथकाने शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी केली. तपासणीदरम्यान अॅनिमियाची कारणे, लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच पौष्टिक आहार, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, स्वच्छता आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी योग्य सूचना देण्यात आल्या.
ही आरोग्य तपासणी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्रीचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी केली.
या आरोग्य तपासणी मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मोठी मदत होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.















