प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा
देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाचा सुंदर संगम



साक्री (दि. १५ ऑगस्ट २०२५) – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे इन्चार्ज श्री. गणेश नांद्रे सर व श्रीमती अंजली लाडे होते.
ध्वजारोहण व शुभेच्छा संदेश





प्रमुख पाहुणे श्री. अमर दादाभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “स्वातंत्र्य हे आपल्याला सहज मिळालेले नाही. लाखो क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळ्या श्वासाने जगतो आहोत. शिक्षणातूनच खरी प्रगती साधता येईल आणि प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ग्रामीण भागातील मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देत आहे, हे खरोखरच अभिमानास्पद आहे.” यानंतर चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्राचार्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
प्राचार्य सौ. वैशाली लाडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “देशभक्ती म्हणजे फक्त झेंडा फडकवणे नव्हे तर शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने काम करणे हे सुद्धा देशभक्तीचाच एक भाग आहे. प्रचितीचे विद्यार्थी हेच संस्कार घेऊन पुढे जातील, अशी मला खात्री आहे.” समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी साबळे यांनी प्रभावीपणे केले.
प्रभावी मार्च पास
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी श्री तुषार सूर्यवंशी व श्री कुणाल देवरे सर यांच्या देखरेखीखाली प्रभावी मार्च पास सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
रांगोळी व सजावट
सविता लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी रेखाटली. डेकोरेशन टीमने संपूर्ण सभागृहाची नेत्रदीपक सजावट केली.
बालविद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार



सौ. प्रभावती चौधरी यांच्या देखरेखीखाली यूकेजी व एलकेजीच्या गोड मुलांनी व अंजली लाडे यांच्या देखरेखीखाली इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनमोहक नृत्य सादर केले. तसेच सौ. ज्योती नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसेनानींच्या वेशभूषा साकारल्या.
देशभक्तीची भावना जागवणारा समारोप
संपूर्ण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगानाने झाली. संपूर्ण सोहळ्यात देशभक्ती, शिस्तबद्धता आणि उत्साहाचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले.


















