प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर – दसरा उत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा
प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे दिनांक १ ऑक्टोबर रोजी दसरा उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख जबाबदार इन्चार्ज किरण देवरे मॅडम होत्या. शाळेचे चेअरमन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आणि शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.
सुंदर सूत्रसंचालन सुनीता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी लावण्या खैरनार व परी घरटे यांनी केले. शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर यांनी दसऱ्याबद्दल प्रभावी भाषण करून सणाचे सांस्कृतिक व नैतिक महत्त्व अधोरेखित केले. तसेच मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी दसऱ्याचे ऐतिहासिक व पारंपरिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले.
या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून उत्साही सहभाग नोंदविला. मुलांनी कुर्ता-पायजमा तर मुलींनी घागरा-ओढणी घालून वातावरण अधिक रंगतदार बनविले. कार्यक्रमाची सुरुवात वहीं पूजन व शस्त्र पूजनाने झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी राम-लक्ष्मण यांच्या भूमिका साकारून उत्साह वाढविला. रामाची भूमिका सिद्धार्थ हसानी यांनी, सीतेची भूमिका विधी कुवर हिने तर लक्ष्मणाची भूमिका हिमांशू अहिरे यांनी केली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण रावण दहन ठरले. वाईटावर चांगल्याचा विजय या संदेशाचे प्रतीक म्हणून रावण दहनाचे आयोजन करण्यात आले. रावणाची १० मुखांची प्रतिमा सायली मॅडम, शरीर मयुरी मॅडम यांनी तयार केले, तर रावणाची उभारणी राहुल सर, अर्चना मॅडम, अश्विनी मॅडम, सरिता मॅडम व वैषाली जगताप मॅडम यांनी केली.
विद्यार्थ्यांनी सायली मॅडम व प्रेरणा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक गरबा व दांडिया नृत्य सादर केले, ज्यामुळे वातावरण रंगतदार व आनंदमय बनले. तसेच रांगोळी वैषाली वाघ व मयुरी सोनार मॅडम यांनी तयार केली, बॅनर प्रेरणा, शीतल, इंदिरा व दिव्या मॅडम यांनी, आपटे पाने सरिता व अश्विनी मॅडम यांनी, “Happy Dussehra” लेखन दिव्या मॅडम यांनी आणि १० शब्द लेखन शीतल शिंपी मॅडम यांनी साकारले. बाण, ढाल, तलवार इंदिरा व वैषाली जगताप मॅडम यांनी तयार केल्या, तर सरस्वती प्रतिमा किरण मॅडम यांनी केली. फोटोग्राफी प्रतीक्षा मॅडम व व्हिडिओ चित्रिकरण योजना मॅडम यांनी केले.
न्यूज लेखनाची जबाबदारी सायली मॅडम यांनी पार पाडली.
दसरा हा सण विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून सीतेची सुटका केली, त्याचीच आठवण म्हणून रावण दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्य-असत्य यामध्ये सत्याचा विजय या उदात्त विचारांचा संदेश देतो.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रिया कुमारी नायक हिने सुनीता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली Vote of Thanks सादर केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना धार्मिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांची जाणीव झाली. शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तसेच चेअरमन प्रशांत पाटील सरांचे मार्गदर्शन आणि समन्वयक राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांचे सहकार्यामुळे दसरा उत्सव अत्यंत यशस्वी व दिमाखदार पद्धतीने पार पडला.