प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्सव
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्सव
साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, आदर व उत्साहाने साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, शिस्त या मूल्यांवर व शास्त्रीजींच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि “जय जवान, जय किसान” या प्रेरणादायी घोषवाक्यावर भाषणे सादर केली. तसेच स्वच्छतेचा संदेश देणारे गीत, देशभक्तीपर गीते व नाटिका विद्यार्थ्यांनी सादर करून वातावरण भारावून टाकले.
इयत्ता नर्सरी ते दहावीच्या असंख्य विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनातील अनेक पैलूंना उजाळा देत भाषण सादर केली.
शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना गांधीजींच्या विचारांचे व शास्त्रीजींच्या कर्तव्यनिष्ठ जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. गांधीजींनी देश स्वातंत्र्य व्हावं यासाठी केलेल्या अनेक कामगिरीचा उल्लेख चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी केला.
कार्यक्रमाचे नियोजन इन्चार्ज सौ. स्मिता नेरकर व श्रीमती नम्रता गोसावी यांनी केले.
मुख्याध्यापिका सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या सत्य-अहिंसेच्या व शास्त्रीजींच्या साधेपणाच्या आदर्शावर चालण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गांधीजींचे राष्ट्रप्रेम व शास्त्रीजींची शिस्तप्रियता जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ झाली व गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळाली.