साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारताचे महान समाजसुधारक, विचारवंत व भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माेठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात भर घातली.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भाषणे, विचार व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जाणीव यांचे संदेश देण्यात आले.
यावेळी शाळेचे संस्थापक आदरणीय श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नेतृत्व प्राचार्या साै वैशाली लाडे यांनी केले. तसेच समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव साेनवणे यांनी कार्यक्रमाचे नियाेजन व समन्वय उत्तम प्रकारे पार पडले.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून सहकार्य केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीत व यशस्वीपणे पार पडला.
अशा प्रकारे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला.






















