धुळे: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या दहावी CBSE बोर्ड परीक्षेत १००% निकाल लावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे संपूर्ण तालुक्यात शाळेचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत श्रद्धा भामरे (९७%) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच यश कोर (९६%), अवनी पवार (९६%) यांनी तालुक्यात द्वितीय, तर ओम अहिरराव (९४%) व प्रणव ठाकरे (९४%) यांनी तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. इतर विद्यार्थ्यांनीही ९०% पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन आदरणीय मा. प्रशांत पाटील यांनी विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य हेच यशाचे खरे सूत्र असल्याचे नमूद केले. शाळेच्या प्राचार्या सौ वैशाली लाडे, समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच शाळेला हा अभिमानास्पद निकाल मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा दहावी CBSE बोर्डात १००% निकाल विद्यार्थ्यांचा शानदार यशोत्सव























