प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये अक्षय्य तृतीया निमित्त संस्कार आणि परंपरेचा संगम
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये अक्षय अक्षय्य निमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कला व कौशल्ये सादर केली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अक्षय तृतीया सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच या दिवशी शुभ कार्याची सुरुवात करण्यामागील विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागली. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी विद्यार्थ्यांना अक्षय तृतीया चे महत्व समजून सांगितले . तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे व समन्वयक श्री. तुषार देवरे आणि श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदराची भावना अधिक दृढ झाली.

















