प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये १ मे निमित्त महाराष्ट्र दिन व
कामगार दिनाचा जल्लोष



प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत त्यांच्या योगदानामुळेच शाळेची सातत्याने प्रगती होत असल्याचे नमूद केले.
प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनीही कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या निष्ठा, समर्पण व प्रामाणिक कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. शाळेच्या यशामध्ये प्रत्येक घटकाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांना प्रेरित केले व एकजुटीने काम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
तसेच प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कासारे व साक्री येथील शाखेतही हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला. शेवटी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मावशी तसेच ड्रायव्हर बंधू यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक यशस्वी केला.




















