प्रचिती पब्लिक स्कूल,पिंपळनेर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा



प्रचिती पब्लिक स्कूल,पिंपळनेर : १ मे २०२६ शुक्रवार रोजी प्रचिती पब्लिक स्कूल,पिंपळनेर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सह्याद्रीच्या कुशीत वाढलेलं राज्य, शौर्य ,संस्कृति यांचा सुंदर साज ,अभिमानाने म्हणूया आज ,*माझा *महाराष्ट्र माझा राज ! १मे१९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी भाषा संस्कृती आणि परंपरेच्या सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो . विद्यार्थ्यांना आपल्या राज्याच्या इतिहास आणि अभिमान समजावा म्हणून तसेच महाराष्ट्र हे संत ,वीर आणि समाजसुधारकांची भूमी आहे हे महत्त्व पटून देणे हे त्यामागचे उद्देश्य आहे.
” मराठी माती, मराठी भाषा,
यातच आहे आपली आश,
एक मेचा हा पवित्र दिवस महाराष्ट्राचा अभिमान खास !
या कार्यक्रमाचे नियोजन श्री .प्रशांत भीमराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्या जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्वप्रथम ध्वज पूजन करून सौ. अर्चना देसले मॅम यांनी ध्वजारोहण केले व आपले मनोगत व्यक्त केले सोबत शाळेचे प्राचार्य श्रीमती. अनिता पाटील मॅम व समन्वयक श्री. राहुल पाटील सर हे उपस्थित होते. शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील सर यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन या दिवशीच महत्त्व पटवून दिले. शाळेचे प्राचार्य सौ .अनिता पाटील मेम यांनी यांनी आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो या विषयी कार्यक्रमाची माहिती दिली.प्रसाद सर व निखिल सर यांनी महाराष्ट्रात व कामगार दिनाच्या उत्कृष्टरित्या माहिती सांगितली.या शाळेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री प्रशांत भीमराव पाटील साहेब यांनी ज्येष्ठ शिक्षिका सौ. अर्चना देसले मॅम यांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या औचित्य साधून ध्वजारोहण चा मान दिला. शाळेचा प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचा व गौरवा चा क्षण आहे . शाळेचे संस्थापक श्री प्रशांत भिमराव पाटील साहेब असेच उपक्रम राबवून शिक्षकांना सन्मानित करत असतात .या सोहळ्याचे छाया-चित्रण मयुरी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर चित्रफित मयुरी सोनार मॅडम यांनी केले . रांगोळीचे सादरीकरण शितल मॅम, सीमा मॅम ,अश्विनी मॅम ,किरण मॅम व योजना मॅम यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक सर यांनी उत्तमरीत्या केले. फुलांची सजावट आणि संपूर्ण वातावरण अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी होते. या कार्यक्रमातू न सर्वांनी एकजुटीचा आणि प्रगतीच्या संदेश घेतला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .






















