
आज दिनांक 13/04/2026 राेजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर ( 14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956 ) हे भारतीय संविधानाचे शिल्पकार ,थाेर समाज सुधारक ,अर्थतज्ञ आणि दलितांचे उद्धारक हाेते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना शिक्षणाला वाघिणीचे दूध असे संबाेधले हाेते. त्यांनी शाेषित वर्गाला शिका ,संघटित व्हा, आणि संघर्ष करा. हा समतेचा संदेश दिला हाेता.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा .श्री प्रशांत भीमराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आजच्या कार्यक्रमाचे नियाेजन याेजना जाधव मॅडम यांनी केले हाेते. या कार्यक्रमात शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पवार सर यांनी अतिशय सुरेखपणे केले. बाबासाहेबांच्या जीवनावर इयत्ता पाचवीचा विद्यार्थी तीर्थ कदम याने छान विचार मांडले.
शाळेचे शिक्षक अभिषेक माेरे सर यांनी आपल्या भाषणातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. तसेच समन्वयक राहुल अहिरे सर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हालाखीच्या परिस्थितीतही स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन वेगवेगळ्या पदव्या प्राप्त करून आपल्या ज्ञानदानाने समाजाला प्रेरित केले हे स्पष्ट केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी त्यांना संविधानाचे जनक म्हणून संबाेधले जाते. हे सांगून विद्यार्थ्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनाची माहिती दिली.
आजच्या कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन सायली मॅम व शीतल मॅम यांनी केले. छायाचित्रणाची जबाबदारी मयुरी मॅडम यांनी सांभाळली. तर बातमी लेखन किरण मॅम यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट अश्विनी मॅम यांनी आभार प्रदर्शन करून केला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनाची ओळख हाेऊन समाजासाठी केलेल्या त्यांच्या याेगदानाची ओळख झाली.
अशाप्रकारे आजच्या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी देखील उपस्थित हाेते.






















