प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री उत्सवाची दिमाखदार साजरी
साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व भारतीय परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
या उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन इन्चार्ज श्री. तुषार सूर्यवंशी, सौ. ज्योती नांद्रे व श्रीमती हर्षदा गांगुर्डे यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तसेच समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांना पूर्ण नऊ दिवस उत्साहाने गरबा खेळविण्यात आला, तसेच प्रत्येक दिवशी शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना त्या-त्या देवीच्या रूपाबद्दल माहिती दिली.
आजच्या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन श्री राहुल पाटील यांनी केले.
हेमांगी बोरसे यांनी विद्यार्थ्यांकडून नऊ देवींच्या स्वरूपांचे प्रतीकात्मक दर्शन घडविणारा नृत्याविष्कार सादर करून घेतला, तर हेमांगी गवांदे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून “रामलीला” या विषयावर नाटिका सादर केली. या कलाविष्कारांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व अध्यात्मिक अनुभव मिळाला.
संपूर्ण शाळेला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. डेकोरेशन टीमने उत्कृष्ट असा मंडप तयार केला होता, ज्यामुळे शाळेचे वातावरण भक्तिभावाने उजळून गेले. याशिवाय भजन, रंगभरण, हस्तकला अशा विविध स्पर्धांनी उत्सवाची शोभा वाढवली. मुलींनी घागरा-चोळी तर मुलांनी कुर्ता-पायजमा परिधान करून पारंपरिक लूक दिला.
या उत्सवाचा आनंद शाळेतील सर्व शिक्षकांनी मनमुराद लुटला.
शिक्षकांनी सुद्धा मनसोक्त गरबा व दांडिया रास मध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा आनंद, भक्तिभाव व भारतीय परंपरेच्या रंगात रंगून गेली.