प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर
येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी कार्यक्रमाची संकल्पना “जय महाराष्ट्राची अस्मिता” अशी होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ. अर्चना देसले मॅडम व सौ. सरिता अहिरे मॅडम यांनी केले होते. या कार्यक्रमात नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे केवळ भौगोलिक ओळख नव्हे, तर ती आपल्या समृद्ध इतिहासाची, संस्कृतीची, भाषेची व विचारपरंपरेची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या शौर्याने महाराष्ट्राला स्वाभिमानाची दिशा दिली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेचा पाया घातला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचा संदेश दिला.
शिवरायांच्या शौर्यावर उभी आहे ओळख आमची,
संतांच्या विचारांनी उजळली वाट आमची,
भाषा, संस्कृती, परंपरा हीच खरी संपत्ती,
जय महाराष्ट्र म्हणण्यातच दिसे अस्मिता आमची —
हा भाव संपूर्ण कार्यक्रमातून प्रत्ययास आला. या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील (संस्थापक), सौ. कविता प्रशांत पाटील (सेक्रेटरी), शाळेच्या प्राचार्या सौ. अनिता श्रीकांत पाटील मॅडम, शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर तसेच सौ. भारती पाटील, सौ. शीतल अहिरराव, सौ. मेघा पाटील, सौ. निकिता जगताप, सौ. अंकिता बाविस्कर, सौ. ज्योती शेवाळे, सौ. सरस्वतीबाई बच्छाव व सौ. रुपाली सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता, नृत्यदेवता नटराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित नाट्यछटा, शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित नृत्य, गरबा, देशभक्तीपर नृत्य व समूहनृत्य अशा विविध प्रकारच्या नृत्याविष्कारांचे सादरीकरण केले. या सादरीकरणातून महाराष्ट्राची शौर्यपरंपरा, श्रमसंस्कृती, लोकसंस्कृती व एकतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. या स्नेहसंमेलनासाठी शाळेचा सभागृह व संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. रंगीबेरंगी प्रकाशयोजना, देखणी मंच सजावट व सुसंगीत पार्श्वसंगीतामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण व आनंददायी झाले होते. विद्यार्थ्यांच्या नृत्य, नाट्यछटा व समूहसादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट व भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची शिस्तबद्ध मांडणी, वेळेचे योग्य नियोजन व उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे स्नेहसंमेलन अतिशय यशस्वी व संस्मरणीय ठरले. याच कार्यक्रमात शाळेत आयोजित करण्यात आलेल्या सायन्स एक्झिबिशनमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
मोठा गट (५ वी ते ८ वी): चैतन्य योगेश बच्छाव (प्रथम),
चैताली जितेंद्र भडाणे (द्वितीय), पुष्कर पंकज पाटील (तृतीय),
दक्ष धनंजय संधानसी (तृतीय), लहान गट (१ ली ते ४ थी):
प्रिन्स अजय पवार (प्रथम), प्रांजल सचिन बिरारीस (द्वितीय),
तनिष मनीलाल गायकवाड (तृतीय)
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम असोसिएशन यांच्याकडून प्रचिती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. अनिता श्रीकांत पाटील मॅडम यांना “आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान करण्यात आला, तसेच शाळेच्या शिक्षिका सौ. सरिता अहिरे मॅडम यांना “आदर्श शिक्षिका पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळाला तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळाली. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे, विज्ञान प्रदर्शनातील यशाचे व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंदाने पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडल्या : कार्यक्रम प्रभारी म्हणून अर्चना देसले मॅडम व सरिता अहिरे मॅडम यांनी संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सुनीता मॅडम व मयुरी मॅडम यांनी उत्तमरित्या पार पाडली. मंच सजावट वैशाली मॅडम व मयुरी मॅडम यांनी केली, तर ड्रेपरीची व्यवस्था किरण मॅडम व अश्विनी मॅडम यांनी पाहिली. दीपप्रज्वलन व प्रकाशव्यवस्था योजना मॅडम, पल्लवी मॅडम व जागृती मॅडम यांनी सांभाळली. विद्यार्थ्यांचा क्रम व शिस्त राखण्याची जबाबदारी किरण मॅडम, वैशाली जगताप मॅडम, स्मिता निकाळे मॅडम, दिव्या मॅडम व शीतल मॅडम यांनी पार पाडली.
रांगोळी व रंगसजावटीचे काम प्रेरणा मॅडम, दिव्या मॅडम, लीना मॅडम, स्मिता मॅडम, जगताप मॅडम, शीतल मॅडम प्रतीक्षा मॅडम यांनी केले. ग्राफिक्स व पोस्टर डिझाईनची जबाबदारी जागृती मॅडम, अश्विनी मॅडम व वैशाली वाघ मॅडम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. चहा-नाश्ता व भोजन व्यवस्थेची जबाबदारी पल्लवी मॅडम, किरण मॅडम, वैशाली मॅडम व दिव्या मॅडम यांनी सांभाळली.गेस्ट ची जेवणाची तयारी प्रतीक्षा मॅडम अश्विनी मॅडम , शितल मॅडमन्युज ची जबाबदारी सायली मॅडम यांनी पार पाडली, तर आभार प्रदर्शन प्रेरणा मॅडम यांनी केली. मान्यवरांना भेटवस्तू प्रदान करण्याचे काम किरण मॅडम, योजना मॅडम व पल्लवी मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या, समन्वयक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारे प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथील वार्षिक स्नेहसंमेलन “जय महाराष्ट्राची अस्मिता” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला.















