ग्रॅज्युएशन गाऊनमध्ये लहानग्यांची झळाळी; प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये यूकेजी ग्रॅज्युएशन सोहळा



साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे यूकेजी वर्गातील विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. लहानग्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन गाऊन व टोपी परिधान करून या विशेष सोहळ्यात आनंदाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व विविध सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्राचार्या सौ वैशाली लाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. तसेच समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे संयोजन सौ कांचन अहिरराव व श्रीमती अश्विनी ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीता पाटील व सौ हिरल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सौ वैशाली खैरनार यांनी केले. ग्रॅज्युएशन डे निमित्त सौ हिरल सोनवणे, श्रीमती अश्विनी ठाकरे व श्रीमती प्रियंका पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणाची जबाबदारी सौ प्रभावती चौधरी व श्रीमती सपना ठाकरे यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे छायाचित्रण श्रीमती नम्रता गोसावी यांनी केले, तर आकर्षक सजावट श्रीमती दीपमाला अहिरराव,सौ पुजा जोहरी व श्री पियुष बागुल यांनी केली. लहानग्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने शाळा परिसर उत्साहाने उजळून निघाला.















