प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळीचा अविस्मरणीय सोहळा परंपरेचा साज, रंगांचा जल्लोष!

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे होलिका दहन व धुलीवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी होलिका पूजन करून सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व जाणून घेतले.
कार्यक्रमाचे संयोजन श्री. शिवाजी साबळे व श्री. गणेश नांद्रे यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सौ. तेजस्विनी घरटे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
यावेळी शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा देत सकारात्मक विचारांचा संदेश दिला. प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ. ज्योती नांद्रे यांनी केले. शाळेची आकर्षक व रंगीत सजावट श्रीमती दीपमाला अहिराव व पियुष बागुल यांनी केली होती. त्यांच्या सुंदर सजावटीमुळे संपूर्ण शाळा परिसर सणाच्या रंगांनी उजळून निघाला व विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला.
अशा उपक्रमांमुळेविद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आदर, एकता व सकारात्मकतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.















